The Laws of Wealth (Marathi) | संपत्तीची नियमावली

Book Introduction Translated and written By : Nagesh V Survase

रोजच्या जीवनातील अगदी वास्तववादी अशी छोटी छोटी उदाहरणे देत डॉ. डॅनियल क्रॉसबी जन्मजात मानवी वर्तन आणि आर्थिक बाजारपेठेतील तिच्या भूमिका, या बद्दल एक अंतर्दृष्टी आपल्याला प्रदान करतात. मानसशास्त्र आणि गुंतवणूक यांच्या अनुबंधाचा वेध घेत, डॉ. डॅनियल, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांच्यासह खर्‍या संपत्तीच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी एक उत्कृष्ट अमूल्य वैभवशील चौकट प्रदान करतात. – डॉ. स्वेतलाना घेर्झी, वर्तणूक वित्त विशेषज्ञ, ‘द लॉज ऑफ वेल्थ’ हे अर्थशास्त्रातील अभिजात पुस्तक आहे. मानसशास्त्राचा आर्थिक निर्णयावर कसा प्रभाव-परिणाम पडतो हे समजून घेण्यास स्वारस्य असलेल्या प्रत्येक गुंतवणूकदारांनी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे! डॉ. डॅनियल क्रॉसबी हे एक मानसशास्त्रज्ञ आणि वर्तणूकीय वित्त तज्ज्ञ आहेत. ते संस्था-संघटनांना, गुंतवणूकदारांना, मानसशास्त्र आणि मार्केट यांच्यातील अनुबंधाचा शोध घेत, त्यातील बारीक सारीक निरीक्षणे व निष्कर्ष समजून घेण्यासाठी सढळ मदत करते. वर्तवणूक वित्त, वर्तनात्मक अर्थशास्त्र, बाजार मानसशास्त्र, गुंतवणूकदार मानसशास्त्र, निर्णय घेण्याचे मानसशास्त्र, ग्राहक मानसशास्त्र, स्टॉक मार्केट मानसशास्त्र, अशा एक ना अनेक गोष्टींवर लेखकाने भरपूर लेख व पुस्तके लिहिली आहेत.

https://tinyurl.com/yd89kx3d: The Laws of Wealth (Marathi) | संपत्तीची नियमावली https://tinyurl.com/ycxy663t: The Laws of Wealth (Marathi) | संपत्तीची नियमावली

Published by thethinkingtreet3

Writing for self enrichment. Brain with knowledge is true empowerment. Nothing is more satisfying than being a student.

Leave a comment